(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरानजीक मिऱ्याबंदर येथील भारती शिपयार्ड कंपनी गोडावूनच्या मागील जंगलमय भागात विनापरवाना हातभट्टीच्या दारू विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गुलाब शिवप्रसाद तिवारी असे त्याचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. ३०) सकाळी साडेअकराच्या सुमारास निदर्शनास आली. संशयित शिपयार्ड गोडावूनचे बाजूस जंगलमय भागात विनापरवाना हातभट्टीची दारू बाळगलेल्या स्थितीत सापडला. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.