( रत्नागिरी / प्रतिनिधी )
शहरालगतच्या मिरजोळे पाटीलवाडी गावठी हातभट्टीची दारु बाळगणार्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शैलेश अनंत सावंत (47, शीळ, वाघजाईवाडी, रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडे 13 हजार 675 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरजोळे पाटीलवाडी येथे गावठी हातभट्टीची दारु विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली असता सावंत याच्याकडे गावठी हातभट्टीचे साहित्य, नवसागर मिश्रित कुजके उकळते रसायन असे एकूण 13 हजार 675 रुपयांचे साहित्य उद्ध्वस्त केले. शैलेश सावंत याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायदा 65 (ब), क, ड, फ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.