( रत्नागिरी )
तालुक्यात अवैधरित्या दारू बाळगणाऱ्यावर पोलिसांकडून धडक कारवाई करण्यात आली. रत्नागिरी शहर व पूर्णगड पोलिसांकडून रविवारी छापा टाकण्यात आला. मिरजोळे पाटीलवाडी, गावखडी, रनपार येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याकडून पोलिसांनी अवैध दारू जप्त केली. पोलिसांच्या माहितीनुसार, गावखडी व रनपार येथे अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २९ जानेवारी २०२३ रोजी पूर्णगड पोलिसांकडून छापा टाकून कारवाई केली.
यावेळी गावखडी भंडारवाडी येथे संतोष रामचंद्र कांबळी (४१, रा. गावखडी भंडारवाडी) याच्या ताब्यात अवैध गावठी दारू आढळली. तर रानपार दर्गारोड येथे दत्तात्रय लक्ष्मण सुर्वे (७१, रा. गोळप-रनपार) यांच्या ताब्यातही अवैध गावठी दारू पोलिसांना मिळाली.
तर रत्नागिरी शहर पोलिसांकडून रविवारी मिरजोळे पाटीलवाडी येथे अवैधरित्या दारू बाळगणाऱ्यावर कारवाई केली. रोशन रवींद्र आंबेकर (२७, रा. फणसवळे, कोंडवाडी) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यात पोलिसांना अवैध गावठी दारू आढळली. तीनही संशयितांविरूद्ध पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ ई नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.