(रत्नागिरी)
गावात फिरून रस्त्याच्या कडेने घरी जाणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. हा अपघात २८ डिसेंबर २०२३ रोजी मिरकरवाडा मोहल्ला येथे झाला. यामध्ये अब्दुल हमीद अली जयगडकर (रा. पिंगी मोहल्ला मिरकरवाडा, रत्नागिरी) हे जखमी झाले आहेत.
अब्दुल हमीद जयगडकर हे २८ डिसेंबर रोजी रात्री ७ वाजण्याच्या दरम्यान गावात फिरून रस्त्याने चालत घरी चालले होते. त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांना डाव्या बाजूला जोरदार धडक दिली. या धडकेत ते रस्त्यावर पडून डाव्या हाताला व कपाळाला मार बसला. या अपघातानंतर चारचाकी वाहनाच्या चालकाने तिथून पळ काढला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.