(चिपळूण)
मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे रेल्वेस्थानकासमोर चारचाकी टाटा गाडीने (नाव माहित नाही) विरुध्द दिशेला जावून मिनी बसला धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिलकधरी कुन्नार यादव ग्रामगंडी (उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मिनी बस चालक गोपीनाथ साळवी (49, कापसाळ, चिपळूण) यांनी पोलीस स्थानकात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनी बस चालक गोपीनाथ साळवी हे आपल्या ताब्यातील बस घेउन मुंबई-गोवा महामार्गाने येत होते. यावेळी रत्नागिरीच्या दिशेहून जाणार्या टाटा कंपनीच्या गाडीचा चालक ग्रामगंडी याने उजव्या बाजूला जात मिनीबसला जोरदार धडक दिली. त्याने दारुच्या नशेत मिनीबसच्या डाव्या बाजूने ठोकर दिली आणि मागील चाकापर्यंत घासत घेवून गेला.
यामध्ये स्वतःच्या व मिनीबस चालकाच्या दुखापतीस तसेच गाडयांचे नुकसान केल्याप्रकरणी ग्रामगंडी याच्यावर भादविकलम 279 नुसार, मोटरवाहन कायदा कलम 184, 185 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.