(चिपळूण)
मित्रावर विश्वास ठेवून स्वतःचा लाखो रुपयांचा डंपर करारपत्रावर दिला. परंतु, मित्राने विश्वासघात करत उत्पन्नापैकी एकही रुपया दिला नाही. उलट हप्ते चुकवून तब्बल ८ लाख २८ हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक मित्रावर विश्वास ठेवून लाखो रुपयांचा डंपर ताब्यात दिला; ८ लाखाला फसला, सोलापूरच्या तरुणावर गुन्हा दाखल केली. या प्रकरणी धोंडिबा नवनाथ पुजारी (२७, रा. मोहोळ, सोलापूर) याच्यावर चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिपळूण शहरातील पाग येथील अमर चंद्रकांत लटके हे जिम प्रशिक्षक असून, त्यांच्याकडे एक डंपर होता. तो डंपर त्यांनी आपल्या ओळखीचा मित्र धोंडिबा नवनाथ पुजारी याला करारपत्र करून सप्टेंबर २०१९ साली चालवण्यासाठी दिला. त्यानुसार गाडीचे हप्ते भरणे तसेच भाड्यापोटी काही रक्कम मालकाला द्यावी, असेही ठरले होते. एक मित्र म्हणून फिर्यादी यांनी धोंडिबा पुजारी याच्यावर विश्वास ठेवून लाखो रुपयांचा डंपर त्याच्या ताब्यात दिला होता.
परंतु दोन वर्षे उलटली तरी पुजारी याने उत्पन्नापैकी काहीच दिले नाही. उलट डंपरवर असलेल्या कर्जाचे हप्तेही थकवले. वारंवार विचारणा करूनही पुजारी दाद देत नव्हता. तसेच डंपर परत देण्यासाठी टाळाटाळ करत राहिला. आपले नुकसान होऊन फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच अमर चंद्रकांत लटके यांनी चिपळूण पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे.