कोविड 19 चा प्रदुभाव रोखण्यासाठी व खबरदारी म्हणून खेड तालुक्यातील कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेवून दापोली मतदार संघातील खेड तालुक्यातील तिसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राला मा. आमदार श्री.संजय कदम यांनी भेट दिली या भेटी दरम्यान तिसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राला खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस वतीने दापोली विधानसभा मतदार संघाचे मा.आमदार यांच्या माध्यमातून पी.पी.ई.किट देण्यात आले.तसेच सध्या स्थितीत किती कोरोना बाधित रुग्ण आहेत.त्यातील किती लक्षणे असणारे आहेत किती लक्षणे नसणारे आहेत.त्यांना कुठे विलगीकरण केले आहे त्यांच्यावर कसे उपचार चालू आहेत. तसेच तिसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राची सर्व माहिती घेतली.
सदर वेळी डॉ श्री.पोटे, डॉक्टर कु.काणेकर, तिसंगी,सरपंच श्री.विवेक भोसले,सवेणी सरपंच सौ.मीना सावरटकर, चिपळूण नागरी पतसंस्था संचालक श्री.रविंद्र भोसले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष अँड श्री.अश्विन भोसले,श्री.नंदकिशोर भोसले,श्री.चंद्रशेख़र भोसले,कु.अल्पेश पाष्टे,कु.वृषभ निकम,श्री.अजित जाधव,श्री.अजित भोसले,श्री.दिपेश दिलीप पाष्टे,कु.अक्षय अजित जाधव तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ,अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग,ग्रामस्थ उपस्थित होते.*