(वैभव पवार / गणपतीपुळे)
मंथन द स्कूल आँफ क्रिएटिव्ह अँडव्हर्टायझिंग अँड आर्ट,रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी दिवाळी निमित्ताने गोड-खाऊ आणि काही वाचनासाठी पुस्तके निवळी व खेडशी येथे कार्यरत असलेल्या ‘माहेर’ सामाजिक संस्थेतील नागरिकांसाठी भेट स्वरुपात दिली. कलाकार हा नेहमी संवेदनशील असतो, तो तसाच असावा, त्याला सामाजिक भान असावे आणि त्याअनुशंगाने मंथन आर्ट स्कूल,रत्नागिरी च्या माध्यमातून दि.११ नोव्हें. रोजी हा उपक्रम राबवण्यात आला.
“माहेर” ही संस्था मागील अनेक वर्ष समाजातील अनाथ, निराधार, लहान मोठ्या वयोगटातील मुले, महिला, वृद्ध, मानसिकरित्या दुर्बल अशा अनेक प्रकारच्या मानवजातीला आपलेपणाचा शाश्वत आश्रय देत आहे. या संस्थेतील सर्वच (जवळपास १३०) लोकांना दिवाळीच्या पूर्वसंधेला हा फराळ देण्यात आला. आपण आपल्यातील माणुसकी आणि संवेदनशीलता जोपासून समाजातील अशा घटकांच्या प्रति आत्मियता ,प्रेम,आनंद व्यक्त करण्याच्या भावनेने ही भेट दिली. हे विद्यार्थ्यांना शिकण्यास मिळाले.
या उपक्रमाचे नियोजन ब्रँचहेड प्रा.संदेश पालये यांनी केले. याप्रसंगी शिक्षकनेते श्री. विनायक हातखंबकर, अभिनेते सुहास भोळे, निवृत्त शिक्षक नंदकुमार यादव, डेप्युटी इंजि.उदय शिंदे, निलीमा शिंदे, नम्रता शिंदे आणि मंथन आर्ट स्कुलचे विद्यार्थी, पालक उपस्थित होते.