(संगमेश्वर / वार्ताहर)
दिनांक 28 सप्टेंबर हा दिवस शासकीय कार्यालयात माहितीचा अधिकार दिन म्हणून साजरा करण्यासाठी शासन निर्णय क्र. केमाअ 2008/पत्र क्र.378/08/सहा.सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक 20 सप्टेंबर 2008 द्वारा आदेश देण्यात आले आहेत. माहितीचा अधिकार या कायद्या चा प्रसार व प्रचार करणे ही शासनाची व प्रशासनाची जबाबदारी आहे. यासाठी माहिती चा अधिकार या विषयावर विविध ऊपक्रम साजरे करून तसेच प्रसिद्ध माध्यमातून प्रसिद्धी देऊन नागरिकांना व स्वयंसेवी संस्थांना उपक्रमात सहभागी करून घ्यावे असे शासनाने सुचविले आहे. त्याची अंमल बजावणी व्हावी यासाठी 28 सप्टेंबर 23 हा दिन साजरा करण्यात यावा.
वरिष्ठ अधिकारी यांनी या संबंधी विविध उपक्रम साजरे करण्यासाठी आदेश परित करावेत यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार संगमेश्वर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. रत्नागिरी, गट विकास अधिकारी पं.समिती संगमेश्वर, मुख्याधिकारी नगरपंचायत देवरूख यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्यचे संगमेश्वर तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये अध्यक्ष मनोहर गुरव, कार्याध्यक्ष शेखर जोगळे, प्रचार प्रमुख एकनाथ मोहिते, सह संपर्क प्रमुख विजय चव्हाण, महिला अध्यक्ष श्रीम.नसिरा काझी, प्रचार संयोजक हरिश्चंद्र गुरव, प्रचार संघटक अनिल सागवेकर, ऊपप्रचार संघटक विजय साळुंखे, सक्रिय कार्यकर्ते प्रमोद रेवणे, संजय टक्के, शिवाजी व्हालकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.