(रत्नागिरी/प्रतिनिधी)
रविवार 24 जुलै रोजी रत्नागिरीतील माळनाका येथे मेडिकल फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला. काहीच हाती न लागल्याने फिरले माघारी फिरण्याची वेळ चोरट्यावर आली. रविवारी पहाटेच्या सुमारासहा ही घटना घडली.
माळनाका येथील स्वामी स्वरूपानंद कॉम्प्लेक्समधील युवराज मेडीकल पहाटेच्या सुमारास फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला खरा पण मेडिकलमध्ये शोधूनही पैसे न सापडल्यामुळे रिकाम्या हातांनी परतावे लागले. त्यांचा हा सारा प्रकार सीसीटिव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे.
याठिकाणी दुकानाचे मालक हे शनिवारी रात्री मेडीकल बंद करून घरी गेले होते. रविवारी सकाळी ते मेडीकल उघडण्यासाठी आले असता दुकानाचे शटर उचकटलेल्या स्थितीत दिसून आले. त्यांनी मेडीकलमधील औषधांची तपासणी केली असता कोणतीही वस्तू चोरीला गेली नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सीसीटिव्ही चेक केला असता चोरटे हे दुकानात पैसे शोधत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे़. कोणत्याच वस्तू गेलेल्या नसल्यामुळे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला नाही.