(क्रीडा)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने २६९ धावा केल्या. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच तिस-या एकदिवसीय सामन्यातही फलंदाजी क्षीण झाली आणि ४९.१ षटकात २४८ धावांवर सर्वबाद झाले. ऑस्ट्रेलियाने तिसरी वनडे २१ धावांनी जिंकून मालिका २-१ ने जिंकली. या सामन्यापूर्वी टीम इंडिया वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होती. मात्र तिसरी वनडे हरल्याने भारत दुस-या क्रमांकावर गेला आहे.
ऑस्ट्रेलियाने मालिका २-१ ने जिंकल्यानंतर दोन्ही संघांचे ११३ गुण झाले असले तरी ऑस्ट्रेलियन संघ भारतापेक्षा पुढे आहे. त्याचवेळी ताज्या वनडे क्रमवारीत न्यूझीलंड तिस-या क्रमांकावर आणि इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे.
भारतीय संघाकडून हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने ३-३ बळी घेतले. शानदार गोलंदाजी करताना हार्दिकने ८ षटकात ४४ धावा देत या तीन विकेट घेतल्या. कुलदीपने १० षटकात ५६ धावा देत ३ बळी घेतले. अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांनी २-२ असे यश मिळवले.