रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंड मध्ये गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमामध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक श्री नामदेव वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यात गुरूंचे किती महत्त्व आहे हे विषद करून सांगितले. श्री अरुण कांबळे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री मिलिंद सुर्वे हे होते. त्यांनी गुरू हे आपल्याला जीवन रुपी भवसागर पार करण्यासाठी शक्ती देतात, हे उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ नेत्रा मोहित यांनी केले.