(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळेपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मालगुंड येथील कविवर्य केशवसुतांच्या जन्मभूमीतील श्री चंडिका जाखडी कलापथक मालगुंड जोशीवाडी या पथकाला येत्या १५ सप्टेंबर २०२३ रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याने या पथकाने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांची आखणी करण्याचे नियोजन हाती घेतले आहे. या चंडिका जाखडी कलापथकाचे मुख्य शाहिर सुनील लोगडे, सहशाहीर निलेश भातडे तसेच या जाखडी कलापथकाचे अध्यक्ष दत्ताराम उर्फ बावा आग्रे, सदस्य सुदेश दुर्गवळी, निखिल हुमणे, महेश फडकले, आदित्य आग्रे, नितीन भातडे आदींसह अन्य सदस्य मोठी मेहनत घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.
मालगुंड जोशीवाडी येथील चंडिका जाखडी कलापथकाने गेली 50 वर्षे आपल्या कलेद्वारे अतिशय तळमळीने कोकणची लोकपरंपरा जपलेली दिसून आली आहे.संपूर्ण मालगुंड पंचक्रोशीबरोबर तालुक्यातील अनेक ठिकाणी आपली कोकणची कला सादर करण्यासाठी चंडिका जाखडी कलापथकाने कायमपणे सहकार्य करण्याची भूमिका पार पाडली आहे.
या चंडिका जाखडी कलापथकाचे अध्यक्ष तथा सर्वेसर्वा दत्ताराम उर्फ बाबा आग्रे यांनी पन्नास वर्षांपूर्वी आपल्या कला पथकाची मुहूर्तमेढ रोवली .त्यानंतर अतिशय यशस्वी घौडदौड करीत 15 सप्टेंबर २०२३ रोजी येथील कलापथक पन्नास वर्षे पूर्ण करीत आहे. त्यामुळे संपूर्ण मालगुंड परिसरातून या कलापथकाच्या कौतुकास्पद कामगिरीचा विशेष गौरव होत आहे.
या कलापथकाचे नाव सातासमुद्रापार नेण्यासाठी सर्वेसर्वा तथा अध्यक्ष दत्ताराम उर्फ बावा आग्रे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य शाहीर सुनील लोगडे ,सहशाहीर निलेश भातडे आदींसह या जाखडी कलापथकामध्ये काम करणाऱ्या सर्व सदस्यांचा ( कलाकारांचा) पन्नास वर्षांच्या प्रवासात मोठा वाटा असल्याचे चंडिका कलापथकाचे अध्यक्ष दत्ताराम उर्फ बाबा आग्रे व शाहीर सुनील लोगडे यांनी सांगितले.
या चंडिका कला जाखडी कलापथकाकडून लोक कलेची सेवा होत आहे त्यामुळे संपूर्ण मालगुंड व गणपतीपुळे परिसरातून या कलापथकाला पन्नास वर्षाकडे वाटचाल होत असल्यामुळे भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत. तसेच या कलापथकाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आखण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमांकडे आता अनेक ठिकाणच्या कलारसिकांसह स्थानिक ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे