(गणपतीपुळे/ वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कविवर्य केशवसुत स्मारक समितीच्या अखत्यारीत असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषद मालगुंड शाखेचे कोषाध्यक्ष तथा मालगुंड येथील “माऊली” भोजनालयाचे मालक आणि सामाजिक,राजकीय चळवळीचे कार्यकर्ते विद्याधर तथा बबन तांदळे यांच्या मातोश्री शोभा शांताराम तांदळे यांचे शनिवारी दुपारच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७५ वर्षे होते. शोभा तांदळे या अतिशय प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून संपूर्ण मालगुंड बाजारपेठेत परिचित होत्या.
आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून त्यांनी योग्य दिशा देण्याचे काम केल्याने त्यांची चांगली ओळख समाजात निर्माण झाली होती. तसेच त्यांचा विशेष गुण म्हणजे त्यांची इच्छाशक्ती फार दांडगी होती. या आदर्शवत मातोश्री चे निधन झाल्याचे वृत्त समजताच यावेळी विविध स्तरावरील मान्यवर व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच त्यांच्या अंत्ययात्रेसाठी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा मालगुंड तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र शिंदे, उपतालुकाप्रमुख प्रकाश जाधव, युवासेना संघटक साईनाथ जाधव, मालगुंडच्या माजी ग्रा.पं.सदस्या सोनिया शिंदे,उत्तम मोरे, शेखर खेऊर,मालगुंड येथील केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, विलास राणे, गजानन सुर्वे, तुकाराम दरवजकर, संदीप घाग, प्रकाश साळवी रवींद्र मयेकर आदींसह मालगुंड व अन्य ठिकाणचे अनेक प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.