(गणपतीपुळे/वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गुरववाडी येथील हरहुन्नरी कलाप्रेमी व्यक्तिमत्व विजय शंकर लिंगायत यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले . मृत्यूसमयी त्यांचे वय 60 वर्षे होते.
विजय शंकर लिंगायत हे मालगुंड येथील वीरशैव लिंगायत समाज मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते होते. समाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा मोठा सक्रिय सहभाग असे. तसेच श्री सोमेश्वर नमन मंडळ मालगुंड व श्री चंडिका नमन मंडळ मालगुंड या दोन्ही नमन मंडळांमध्ये त्यांनी एक हरहुन्नरी कलाकार म्हणून आपलं नाव नुकतच कमावलं होतं. कुठल्याही भूमिकेतून ते आपल्या अभिनयाचा ठसा उमटवून त्यांनी दोन्ही नमन मंडळात एक हुकमी कलाकार म्हणून आपली ओळख निर्माण केली होती.
मालगुंड येथील दोन्ही नमन मंडळांना हवहवसं वाटणारं कलाकार व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या अभिनयाने संपूर्ण मालगुंड पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांकडून त्यांची वाहवा होत असे. मालगुंड येथील दोन्ही नमन मंडळांमध्ये आपली कलाकाराची भूमिका साकारत असताना त्यांनी रंगभूषा व व नेपथ्य या दोन्ही क्षेत्रांमध्ये ही आपली ओळख निर्माण केली होती. एकूणच नमन व विविध सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा हिरीरीने सहभाग असे.
तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आवडीने सहभाग घेणारे एक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा मालगुंड गावामध्ये सहभाग होता. अशा या हरहुन्नरी कलाकाराचे आकस्मिक निधन झाल्याने संपूर्ण मालगुंड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू , भाऊ असा परिवार आहे. एकूणच त्यांच्या निधनाने मालगुंड येथील श्री सोमेश्वर नमन मंडळ व श्री चंडिका नमन मंडळ मालगुंड या दोन्ही मंडळांमध्ये कलाकार स्वरूपात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मत व्यक्त होत आहे.