(गणपतीपुळे/वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड बौद्धवाडी येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 17 तथा बौद्ध ग्रामस्थ मंडळ स्थानिक व मुंबई मंडळ आणि आदर्श महिला मंडळ यांचे संयुक्त विद्द्यमाने विश्व शांतिदूत तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती अर्थात वैशाखी बुद्ध पौर्णिमा सोमवार दिनांक सोमवार दिनांक 16 मे रोजी धम्मचेतना बुद्धविहारात मोठ्या जल्लोषी वातावरणात साजरी करण्यात येणार आहे. या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने संयुक्त मंडळ यांच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
या बुद्ध पौर्णिमेनिमित्त सोळा रोजी सकाळी दहा वाजता धम्मचेतना बुद्ध विहाराच्या पटांगणात धम्म ध्वजारोहन, त्यानंतर धार्मिक पूजा पाठ, धम्मावर आधारित मार्गदर्शनपर मनोगते व त्यानंतर दुपार सत्रात मनोरंजनात्मक स्पर्धा सायंकाळी जाहीर सभा व रात्री करमणुकीचा कार्यक्रम म्हणून प्रबोधनात्मक विविध गुणदर्शन कार्यक्रम धम्म धम्मचेतना बुद्ध विहाराच्या रंगमंचावर सादर होणार आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम मालगुंड येथील आम्रपाली कलामंचच्या वतीने सादर करण्यात येणार आहेत.
यावेळी मालगुंड बौद्धजन पंचायत समिती व मालगुंड बौद्ध ग्रामस्थ मंडळ मुंबई चे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत एकूणच यंदा कोरोना निर्बंधमुक्त जयंती असल्याने अनेक बौद्ध बांधवांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.