(तरवळ/अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेज मालगुंड मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ मिसाईल मॅन डॉ. ए. पी .जे .अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. ए .पी. जे .अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. नामदेव वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
थोर शास्त्रज्ञ डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण भारतात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो, त्यानिमित्ताने मालगुंड विद्यालयाचे शिक्षक व प्रमुख वक्ते श्री. रुपेश तावडे यांनी आपल्या भाषणात माणसाच्या जीवनात पुस्तकांचे महत्त्व काय आहे हे उपस्थित विद्यार्थ्यांना या वेळी आवर्जून सांगितले व मार्गदर्शन केले. तसेच डॉ. ए .पी. जे अब्दुल कलाम यांच्या जीवनातील काही प्रेरणादायी प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले, तर आपल्या अध्यक्षीय विचारातून प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. नामदेव वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना “वाचाल तर वाचाल”हा मूलमंत्र दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक श्री. नितिन मोरे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. मिलिंद सुर्वे यांनी केले तर आभार श्री. अमित जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.