( जाकादेवी / वार्ताहर )
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेन सोसायटी , मालगुंड या सोसायटीच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक शनिवार दि. ७ जानेवारी रोजी पार पडली. कार्यकारी मंडळाच्या एकूण ९ जागांसाठी १० उमेदवार रिंगणात होते. यामध्ये मालगुंड शिक्षण संस्थेने घोषित केलेले नऊच्या नऊ उमेदवार विक्रमी मतांनी विजयी झाले. शिक्षण संस्थेच्या ४२९ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला.पैकी ५ मते बाद झाली.
शिक्षण संस्थेचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- परेश भिकाजी हळदणकर ३७९ मते,संदीप बाबाराम कदम ३८२ मते, रोहित दिलीप मयेकर ३९६ मते, सुनिल मुरारी मयेकर ३९१ मते, श्रीकांत वसंत मेहेंदळे ३५९ मते,विवेक सदानंद परकर ३६५ मते, गजानन कमलाकर पाटील ३५६ मते, किशोर रामचंद्र पाटील ३६८ मते,विनायक तुकाराम राऊत ३६८ मते मिळाली. हे सर्व ९ उमेदवार मालगुंड शिक्षण संस्थेने घोषित केले होते. हे सर्व उमेदवार कार्यकारी मंडळावर निवडून आले आहेत. तसेच नऊ जागांसाठी दहा नंबरचे उमेदवार राजेंद्र गोविंदराव शिंदे यांना ११४ मते पडली असून त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.,
सदर निवडणुकीचे काम नंदकुमार यादव, नंदकुमार साळवी, अजित पाटील यांसह रमेश पाटील, संजय थोरात, सुनिल मोडक,बाबासाहेब बेडक्याळे ,सुशांत लाकडे, नेत्रा दुधाळे इत्यादींनी काम पाहिले.
मालगुंड शिक्षण संस्थेची नियोजित वार्षिक सर्वसाधारण सभा यावेळी पार पडली. प्रारंभी मालगुंड शिक्षण संस्थेमधील यावर्षी निधन पावलेल्या मान्यवर सभासद व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभासदांनी शिक्षण संस्थेने घोषित केलेल्या उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून दिल्याबद्दल संस्थेचे चेअरमन बंधू मयेकर यांनी सर्व विजयी उमेदवारांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे हार्दिक स्वागत केले. बंधू मयेकर यांनी मालगुंड शिक्षण संस्थेच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये चाललेल्या उत्तम कामाचे कौतुक करून दहावी बारावी शंभर टक्के निकालाची परंपरा राखल्याबद्दल अभिनंदन करून सभासदांना शैक्षणिक कामाची सविस्तर माहिती दिली.यावेळी त्यांनी देणगीदारांचा आवर्जून उल्लेख करून शिक्षण संस्थेतर्फे त्यांना धन्यवाद दिले. माझ्या शिक्षण संस्थेच्या शाळांतील सर्व शिक्षक, कर्मचारी अतिशय मेहनतीने अध्यापन करून संस्थेचा नावलौकिक वाढवत असल्याचेही ते बोलले. यावेळी नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाचे संचालक ,निमंत्रित संचालक, सल्लागार यांची नावे सभेत घोषित करण्यात आली. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन शिक्षण संस्थेचे सचिव विनायक राऊत यांनी केले.