(रत्नागिरी)
मागील काही दिवसांपासून शहरातील मारूती मंदीर येथील मारूतीचे मंदीर हलविण्यात येणार असल्याचे संदेश समाज माध्यमांवर फिरत होते. त्याचप्रमाणे मारूती मंदीर येथे मंदीर हलविण्याला विरोध करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले होते. या पार्श्वभूमिवर मंत्री सामंत यांनी गुरूवारी जयस्तंभ येथील कार्यालयात पत्रकार परिषद घेवून मंदीर संदर्भात स्पष्टीकरण दिल़े आहे.
यावेळी बोलताना सामंत म्हणाले, मारूती मंदीर येथील मंदीर हलविण्यात येणार असल्याची अफवा आह़े. नगरपरिषदेच्या निवडणूका जवळ आल्याने विरोधकांकडून मंदीराचे राजकारण करण्यात येत आह़े. शहरात जातीय तेढ निर्माण करून वातावरण दूषित केले जात आहे, असा आरोप मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केला.
ते पुढे म्हणाले, मारूती मंदीर येथील मंदीराच्या दगडालादेखील हात लावला जाणार नाह़ी. मंदीरासाठी आपण दीड कोटी रूपयांचा आराखडा तयार केला आह़े. या मंदीराला सर्वात पहिली देणगी ही सामंत परिवाराकडून असेल़. मात्र काही लोक राजकीय स्वार्थ साधण्यासाठी मंदीराचा आधार घेत आहेत असे ते म्हणाले.