(संगमेश्वर/प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी मानसकोंड येथील सामाजिक कार्यकर्ते, तरुण, तडफदार सुहास मायंगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. देवरुख येथील तहसीलदार कार्यालयात सोमवार 26 सप्टेंबर रोजी ग्रामस्थांच्या उपस्थित अर्ज दाखल केला.
आंबेड बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये तीन गावांचा समावेश आहे. कानरकोंड, आंबेड, मानसकोंड अशी ही तीन गावे आहेत. मानसकोंड येथील ग्रामस्थांनी सुहास मायंगडे यांनी केलेल्या विविध कामांची दखल घेत तरुण उमेदवाराला संधी देण्याचा निर्णय घेतला. मायंगडे यांनी वार्ड क्र. 1 मधून सरपंच पदासाठी फॉर्म भरला. निवडणूक निर्णय अधिकारी पारशे यांच्याकडे आज अर्ज भरला.
अर्ज दाखल करण्यासाठी सुहास मायंगडे यांच्यासोबत कानरकोंड येथील ममता राजेश कानर, महिला उमेदवार तसेच ओबीसी राखीव महिला उमेदवार संचिता संतोष पाचकले यांनी अर्ज भरला.
यावेळी गणुजी फेपडे, दत्ताराम कानर, सीताराम कानर सुमंत फेपडे, प्रकाश खापरे, दिलीप पाचकले, शशिकांत पांचाळ, दिनेश पाचकले, नितीन बेंडखले, सदानंद किंजळे संतोष फेपडे इ, उपस्थित होते.