(संगमेश्वर)
मानवाधिकार हक्क संरक्षण असोसिएशन संगमेश्वर तालुक्याच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हक्क संरक्षण बाबतची माहिती तसेच असोसिएशनचे उद्देश, कार्य पद्धती, काम करण्याचे नियम व नियमावली बाबत चर्चा करण्यात आली. आज जनतेचे हक्क पायदळी तुडवले जात आहेत. त्यांच्या हक्काना बाधा आणली जात असून, मानवी हक्कांबाबत जनजागृती करणेबाबत, रस्त्यांचे प्रश्न, राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा निकृष्ट दर्जा अशा विविध ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
याबाबत संबंधित विभागांना पत्रव्यवहार करण्याचे ठरविण्यात आले. प्रत्येक सदस्याने आपल्या गावातील ज्वलंत प्रश्नांवर लक्ष देण्याबाबत चर्चा करण्यात येऊन सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. संगमेश्वर तालुका कार्यकारणीची दर महिन्याला मासिक सभेचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व सदस्य यांना जिल्हाध्यक्ष श्री तेजस भोपलकर यांनी मानवाधिकार आयोगाबद्दल मार्गदर्शन केले.
या बैठकीला श्री तेजस भोपळकर, जिल्हाध्यक्ष, श्री शेखर जाधव- जिल्हा सरचिटणीस, श्री महेश शिंदे अध्यक्ष, श्री पंढरीनाथ मोहिरे – उपाध्यक्ष, श्री शेखर जोगळे- शहर अध्यक्ष, कार्याध्यक्ष श्री मनोहर गुरव, हरिश्चंद्र गुरव, विजय आंब्रे, श्री सुरेश केदारी आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. शेवटी मनोहर गुरव यांनी उपस्थितांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहीर केले.