(देवरूख / प्रतिनिधी)
अखिल भारतीय मानवाधिकार समितीचे केन्द्रीय पदाधिकारी यांनी नुकताच जिल्हादौरा करून समितीच्या कामाचा आढावा घेवून कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.
या समितीचे केंद्रीय अध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरिक्षण रामदास खोत, घनशाम सांडीम आदी पदाधिकारी यांनी देवरूखात येवून जिल्हा व तालुक्यातील मानवाधिकार समितीच्या कामकाजाची माहीती घेवून स्थानिक पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष तेजस भोपळकर यांनी त्याचे स्वागत केले. त्यावेळी राज्याचे कार्याध्यक्ष बाळकृष्ण वनकर, पंढरीनाथ मोहिरे, ग्रामसेवक संघटनेचे नेते व मानवाधिकार समितीचे जिल्हा सरचिटणीस शेखर जाधव. मारूती राऊत, विजय आंब्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.