(देवरूख / सुरेश सप्रे )
मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हात नवनिर्वाचित कार्यकारणी सदस्यांचा पदग्रहण सोहळा देवरुख येथे जिल्हाध्यक्ष तेजस भोपळकर यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र कार्यध्याक्ष बाळकृष्ण वनकर यांच्या मार्गदशनाखाली उत्साहात संपन्न झाला. व्यासपिठावर जिल्हा सल्लागार मुराद मुकादम. जिल्हा महिला कार्याध्यक्ष सौ. संध्या बने चिपळूण महिला अध्यक्षा सौ. स्वाती हडकर आदी उपस्थित होते.
जिल्हयातील विविध पदांवरती नियुक्त झालेल्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना पदग्रहणतेची नियुक्तीपत्र व संघटनेचे आयकार्ड देऊन कार्य तत्परतेची शपथ देण्यात आली व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
समाजामध्ये महिलांवरील अत्यांचार व इतर समस्या यावरती शाळा कॉलेज मध्ये संघटनेच्या माध्यमातून प्रबोधन होणे आवश्यक आहे, असे विचार सौ सुनिता पाटील यांनी मांडले. तसेच स्वअनुभवाचे अनेक दाखले देऊन संघटना किती महत्वाची आहे हे सांगितले.
महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष बाळकृष्ण वनकर यांनी संघटना पार्श्वभुमी, अधिकार, कर्तव्य निष्ठता, समाजामध्ये बोकाळलेली सामाजिक व्यवस्था या सखोल माहिती दिली. रफिक भाई दोस्ती रत्नागिरी, संजय सावंत लांजा, भाजपा महिला तालुका अध्यक्षा सौ. कोमल रहाटे, सुहास पाटील, विजय राऊत, शेखर जोगले, हिदायत शेख, सुशांत वेल्हाळ, जयकुमार जाधव, शेखर जाधव, अविनाश गुरव आदी मान्यवर व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते