सूर्यदत्त ग्लोबल बिझनेस फोरमतर्फे देण्यात येणारा पहिलाच ‘सूर्यभारत ग्लोबल अवॉर्ड-2023’ प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री माधुरी दीक्षित-नेने यांना प्रदान करण्यात आला. जयपूरमध्ये (राजस्थान) झालेल्या दिमाखदार सोहळ्यात सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा संजय चोरडिया यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह, मेडल व स्कार्फ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
माधुरी दीक्षित-नेने यांनी ‘सूर्यदत्त’च्या 25 वर्षांच्या वाटचालीचे कौतुक केले. ‘सूर्यदत्त’चा हा पुरस्कार नम्रपणे स्वीकारत असल्याचे नमूद करत माधुरी म्हणाल्या, ‘समाजातील चांगल्या व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. तसेच नव्याने स्थापन केलेला सूर्यदत्त ग्लोबल बिझनेस फोरम जगभरातील उद्योजकांना एका व्यासपीठावर आणून व्यवसायाची आदानप्रदान करण्याची संधी निर्माण करत आहे, असे माधुरी दीक्षित यांनी आवर्जून सांगितले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “उद्योग करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या समविचारी लोकांना एकत्र आणण्यासाठी ‘एसजीबीएफ’ महत्वाची भूमिका बजावेल. स्थापनेच्या पहिल्याच वर्षी दिला जाणारा पुरस्कार माधुरी दीक्षित यांना प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपल्या कार्यातून, कलेच्या सादरीकरणातून ज्यांनी भरीव योगदान दिले आहे, अशा महान व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
जागतिक स्तरावर व्यवसायवृद्धी, उद्योगांच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी सूर्यदत्त ग्लोबल बिझनेस फोरमची स्थापना करण्यात आली आहे.””या फोरमच्या माध्यमातून उद्योजकांना मार्गदर्शन, व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आहे. सर्वच स्तरातील लोकांना एकत्र आणत विविध प्रकारची चर्चासत्रे, परिषद, कार्यक्रम घेतले जाणार आहेत. उद्योग व शिक्षण क्षेत्रातील गेल्या ४० वर्षांच्या अनुभवाचा लाभ भावी पिढीला देण्याचा यामागे उद्देश आहे.
जगभरातील विविध संस्था, कंपन्या, फोरम, असोसिएशनवर सदस्य, फेलो म्हणून काम करताना आलेले अनुभव, मिळालेले ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे. ‘शेअरिंग इज ग्रोइंग’ आणि ‘नेटवर्किंग इज नेटवर्थ’ या दोन तत्वांवर माझे काम सुरु आहे,” असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले.