डंख मारणाऱ्या प्राण्यांची/ कीटकांची संख्या खूप जास्त आहे. ती जवळपास एक हजाराहून अधिक आहे. कारण प्रत्येक जीव स्वतःच्या रक्षणासाठी डंख हत्यार वापरतो. आणि अनेक जीव असे आहेत, जे डंख अनेक वेळा वापरू शकतात. म्हणजेच, ते एखाद्याला एकापेक्षा जास्त वेळा डंख देऊ शकतात. पण मधमाशी हे करू शकत नाही, मधमाशी फक्त एकदाच चावा घेऊ शकते. आणि हा डंख फक्त मादी मधमाशी सोबत असू शकतो.
इतर प्राण्यांच्या नांगीप्रमाणेच मधमाशीचा डंख सुईसारखा असतो. पण मधमाशीचा डंख हा दुहेरी करवतीचा असतो. मधमाश्या त्यांच्या डंखाचा वापर करून मानव आणि प्राण्यांना पळवून लावतात. जेव्हा मधमाश्या डंख मारतात, तेव्हा मधमाशीच्या डंखाने शरीरातील पेशी नष्ट करणारे विष बाहेर पडते. पण त्याच्या वेगळ्या रचनेमुळे डंख मारल्यानंतरही मधमाश्या आपल्या शरीरातून किंवा कोणत्याही त्वचेतून डंख काढू शकत नाहीत. म्हणजे डंख त्वचेत अडकतो आणि हा डंख काढण्यासाठी मधमाश्या खूप प्रयत्न करतात. खूपदा डंख काढण्याच्या प्रयत्नात मधमाशीचा जीवही जातो. त्यामागील कारण म्हणजे त्यांची पचनसंस्था या स्टिंगशी जोडलेली असते. कारण त्यांचा डंख फक्त शरीरातच राहतो आणि त्यामुळे मधमाशी मरते.
मधमाशी आपल्या पोळ्याचे संरक्षण करण्यासाठी डंख वापरते. पण एका संशोधनात असे आढळून आले आहे की, मधमाशांचा मृत्यू डंख मारल्यानंतरच होईल याची शाश्वती नाही. कारण मधमाशांचा मृत्यू तेव्हाच होतो जेव्हा डंख शरीरात राहतो. त्यामुळे त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम बाहेर येते आणि मधमाशी मरते. पण काही मधमाश्याही आपले डंख प्रयत्नपूर्वक काढतात. त्यामुळे त्यांचा मृत्यू होत नाही.
माणसासाठी मधमाधीचा डंख जीवघेणा
मधमाधीचा डंख वेदनादायी असतो. मात्र काही लोकांसाठी तो जीवघेणा ठरतो. प्रामुख्याने अॅलर्जिक रिअॅक्शनमुळे मधमाशीचा डंख झाल्यानंतर मृत्यू होऊ शकतो. मधमाशीच्या नांगीची अॅलर्जी असणार्यांचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. anaphylactic shock मुळे मृत्यू होण्याची शक्यता असते.
तीव्र वेदना, त्वचा पांढरी होणं, त्वचेवर रिअॅक्शन दिसणं, त्वचा लाल होणे, पुरळ येण, अस्वस्थ्य वाटणं, तीव्र डोकेदुखी, मळमळ, उलट्या, पोटदुखी, बेशुद्ध होणं, चक्कर येणं, हृद्याचे डोके वर खाली होणं, रक्तदाब कमी होणं, धाप लागण ही मुख्यतः लक्षणे आढळतात.
प्रत्येक वेळेस मधमाशी चावल्यानंतर वैद्यकीय मदतीची गरज भासेलच असे नाही. मधमाशी चावल्यानंतर सौम्य वेदना, खाज येणं, माशी चावल्याच्या जागी पांढरा डाग, त्वचेवर लालसरपणा, सूज अशी लक्षण आढळतात. ट्विझरच्या (लहान चिमटा) मदतीने त्वचेमध्ये अडकलेला मधमाशीच्या पंखाचा भाग काढा. तो भाग साबणाने स्वच्छ करा. त्यावर बर्फ लावा. बर्फामुळे वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते. या प्रथमोपचारानंतरही त्रास वाढत असल्यास तत्काळ रूग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करा. सूज वाढत असल्यास किंवा श्वास घेताना त्रास होत असल्यास तात्काळ वैद्यकीय मदत मिळणं आवश्यक आहे.