( रत्नागिरी )
अफवा पसरवल्याने तरुणाला तिघांनी मारहाण केल्याची घटना फणसोप येथे घडली. या मारहाणपकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्मान रमजानमिया मस्तान, आदनान रमजानमिया मस्तान, हमिदा रमजानमिया मस्तान (तिन्ही रा. नवा फणसोप, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद साहिल अब्दुल सत्तार होडेकर (22, सध्या नेरुळ, सध्या फणसोप) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिली. ही घटना 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फणसोप रेशन दुकानासमोर अम्मान मस्तान, आदनान मस्तान, हमिदा मस्तान यांनी साहिल होडेकर याच्याविरुध्द अफवा पसरवल्याने होडेकर याने आम्मान मस्तान याला ‘तू माझ्याबद्दल अफवा का पसरवतोस’ असा जाब विचारताच ‘मी तुझ्याबद्दल अफवा पसरवली आहे, तुला काय करायचे आहे ते कर असे बोलून साहिल होडेकर व त्याचा भाऊ सुहेल होडेकर यांना हाताचे थापटाने मारहाण व शिवीगाळ करत धमकी दिली. याप्रकरणी साहिल होडेकर याने शहर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आम्मान मस्तान, आदनान मस्तान, हमिदा मस्तान या तिघांवर भादविकलम 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.