( रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी नगरपरिषद आरोग्य विभागातर्फे स्वच्छ सर्वेक्षण 2023 आणि माझी वसुंधरा 3.0 अंतर्गत शैक्षणिक वर्ष सन 2022- 23 साठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये जिंगल लेखन स्पर्धेत रा.भा.शिर्के प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री पी.सी. जाधव यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
जिंगल लेखन हा जितका ऐकायला सोपा तितकाच रचनात्मक दृष्ट्या कठीण प्रकार मानला जातो. त्यामुळे हा एक कौशल्याचा विषय समजला जातो श्री पी.सी.जाधव यांचा त्यात हातखंडा असल्याचे बोलले जाते.
आतापर्यंत त्यांनी विविध इंग्रजी तसेच मराठी कविता, नाटके , पथनाट्ये ,चरित्रपर लेख , शैशणिक लेख, बालकथा, ललित कथा, ग्रामीण कथा, इत्यादींचे लेखन केले आहे. गतवर्षात देखील त्यांनी यामध्ये उत्तम यश संपादन केले होते. त्यांनीच लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या प्रशालेच्या स्काऊट गाईड विभागाच्या “पाणी हेच जीवन” या विषयावरील पथनाट्यास देखील सलग दोन वर्ष उत्तम यश मिळत आहे. त्यांच्या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री आर.बी. चव्हाण ,उपमुख्याध्यापक श्री के. डी. कांबळे ,पर्यवेक्षिका सौ पी. एस. जाधव तसेच सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.