माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात गृह भेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेत आतापर्यंत 2 लाख 86 हजार 25 जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले असून यातून 136 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत यातील 44 जणांना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 710 पथकांनी तपास मी कामाला सुरुवात केली होती आता सध्या 1348 पथके घरोघरी भेटी देऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत या अंतर्गत 83 हजार 219 घरांना भेटी देण्यात आल्या यातून एकूण 92 हजार 673 कुटुंबातील 2 लाख 75 हजार 536 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
या भेटीदरम्यान नागरिकांची ऑक्सीमीटरवर ऑक्सीजन पातळी तपासण्यासह त्यांच्या शरीराचे तापमान तपासणे तसेच सहा मिनिटांची वॉक टेस्ट घेणे आदी तपासण्यांचा समावेश आहे.
या तपासणी दरम्यान 11,347 घरे बंद असल्याचे आढळून आले आहे यांची पातळी चालण्याच्या तपासणीनंतर 95 पेक्षा खाली गेली अशांची एकूण संख्या 237 इतकी आढळली आहे तर ताप सर्दी खोकला असणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या 489 इतकी होती.