कोव्हिडं -१९ चा प्रादुर्भाव रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढत असून प्रत्येक गावागावांमध्ये कोव्हिडं -१९ बाबत जनजागृती करण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत रत्नागिरी जिल्ह्यात आज पासून माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे जिल्हा परिषद गटातील तील किरबेट भोवडे ग्रामपंचायत मधून “माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी” या अभियानाचा शुभारंभ संगमेश्वर तालुका पंचायत समिती सभापती जया माने ह्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
त्याप्रसंगी उपसरपंच प्रशांत अडबल, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य अधिकारी डॉ. पी. बी. अदाटे, पोलीस पाटील श्री. अडबल, आरोग्य सेविका, आशा सेविका, इतर नागरिक उपस्थित होते.
या मोहिमअंतर्गत गावातील सर्व घरामधून जाऊन तेथे घरातील सदस्यांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. तसेच ह्या मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभेल असा विश्वास सभापती जया माने यांनी व्यक्त केला आहे. तसेच ही मोहीम संपूर्ण तालुक्यात उत्तमरित्या राबविली जाईल याकडे लक्ष देण्यात येणार आहे असे सभापती जया माने यांनी सांगितले.