(पुणे)
कसबा-चिंचवड पोटनिवडुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा शरद पवार यांच्यावर निशाणा साधत मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून प्रयत्न झाले. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला. पण मी अभिमन्यूकडून अनेक गोष्टी शिकल्या, तो चक्रव्यूह कसा तोडायचा, हे आम्ही केले आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सरकार स्थापन केले आहे, असे म्हटले.
पहाटेच्या शपथविधीबद्दल मी एवढेच सांगेल की मी बोललो ते सत्य बोललो. त्याचे वेगवेगळे अर्थ तुम्ही काढले. मी बोललो ते एकदा पुन्हा शांत ऐका, दुस-या पुराव्याची गरज पडणार नाही. ते मी अर्धे बोललो आहे, उरलेले वेळ आल्यावर बोलेन. तर कसबा असो किंवा चिंचवड भाजप दोन्ही ठिकाणी निवडून येईल देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले.