(लांजा)
कोकण विभाग शिक्षक मतदार संघातून बारा वर्ष शिक्षकांचे प्रतिनिधित्व केलेले कार्यसम्राट शिक्षक, माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांच्या जयंतीचे औचित्य साधत रामनवमीच्या दिवशी जिल्ह्यातील गुणवंत माध्यमिक शिक्षकांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन १० एप्रिल २०२२ महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.
ज्ञान प्रबोधिनी माध्यमिक विद्यालय दत्तवाडी डोंगर तालुका राजापूर येथे नुकतेच उभारण्यात आलेल्या रामनाथ मोते यांच्या भव्य स्मारकस्थळी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. कोकण विभाग अध्यक्ष रमेश जाधव यांच्या संकल्पनेतून तसेच संघटनेचे विद्यमान राज्य अध्यक्ष सुधीर घागस यांच्या सहकार्याने कोकण विभागातील शिक्षक आमदाराचे पहिले स्मारक दत्तवाडी राजापूर येथे उभारण्यात आले आहे.
तिथीनुसार जन्मदिवस व तिथीनुसार रामनवमीच्या दिवशी आमदार मोते यांचा जन्मदिवस मोठ्या संख्येने कार्यकर्ते साजरा करीत असतात. दिनांक १० एप्रिल रोजी मोते यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सकाळी ११ वाजता सन्मान सोहळ्याला सुरुवात होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी यांनी माहिती दिली. या दिवशी सन्मानित होणारे जिल्ह्यातील गुणीजन शिक्षक माधव शिरसागर, गणेश दैत, संदीप साखरकर, दीपक पाटील शशिकांत कींजळकर, ज्ञानेश्वर शिंदे, सुरेश भंडारी, अरुण कुराडे महेंद्र कोळेकर, शशी आठले अशोक महाडेश्वर, रुपाजी कांबळे तसेच रामनाथ मोते यांच्या स्मारकासाठी भरीव योगदानाबद्दल भरत पाटील, उत्तम कांबळे खेड , रत्नाकर मिसाळ सुरेश भंडारी चिपळूण, नमिता वैद्य प्रसन्न वैद्य गुहागर, राहुल सप्रे आशिष मुकादम संगमेश्वर, धनाजी पाटील महेंद्र कोळेकर रत्नागिरी, अमोल मेस्त्री, शशी आठले लांजा, अरुण कुराडे उदय कांबळे, राजापूर या मान्यवर शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच माध्यमिक शिक्षक पतपेढी वर मागील पाच वर्षांपासून यशस्वीपणे कारभार सांभाळणारे पतपेढी संचालक व माजी अध्यक्ष उत्तम कांबळे विद्यमान अध्यक्ष बळवंत चौगुले, महेंद्र साळगावकर माजी अध्यक्ष सुनील गौड तज्ञ संचालक एस एस पाटील यांचाही सन्मान होणार आहे.
तरी या सोहळ्याला रामनाथ मोते स्मारक ज्ञान प्रबोधिनी विद्यालय दत्तवाडी तालुका राजापूर येथे बहुसंख्येने उपस्थित ररहावे असे आवाहन कोकण विभागाचे अध्यक्ष रमेश जाधव, जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी सचिव राहुल सप्रे, राजापूर तालुकाध्यक्ष अरुण कुराडे, सचिव उदय कांबळे, प्रांत सदस्य प्रसाद पणगेरकर यांनी केले आहे.