(रत्नागिरी)
मागेल त्याला शेततळे देण्याची तयारी कृषी विभागाने केली असताना आता शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठीही पाऊण लाखाचे अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
मागेल त्याला शेततळे या योजनेला कोकणातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद देताना टंचाईभागात पावसाचे वाया जाणारे पाणी तळ्यात साठविण्याची तयारी केली. रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेत १ हजार २०० शेतकऱ्यांनी सहभाग घेत शेततळ्यांचे प्रस्ताव दिले. त्यापैकी ७० टक्के प्रस्तावांना मान्यता देऊन ते प्रत्यक्षात सक्रिय झाले. मात्र, पाऊस गेल्यानंतर तळ्यातील झिरपांनी तळे आटून पाणी वाया गेले. त्यामुळे या तळ्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी तळ्याचे अस्तरीकरण करणे गरजेचे असल्याने आता मागेल त्याला शेततळे या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे.
या तळ्यांच्या अस्तरीकरणासाठी ७५ हजाराचे अनुदान मिळणार आहे. अस्तरीकरणाचा खर्च शेतकऱ्यांच्या तळ्यातील झिरपांनी तळे आटून पाणी वाया गेले. त्यामुळे या तळ्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी तळ्याचे अस्तरीकरण करणे गरजेचे असल्याने आता मागेल त्याला शेततळे या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे.
अस्तरीकरणाचा खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यासाठी अनुदान देण्याची तयारी कृषी विभागाने केली आहे. त्यामुळे आता मागेल त्याला शेततळे या योजनेत तळ्याच्या अस्तरीकरणासाठीही अनुदान मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन प्रस्तावात अस्तरीकरणाची अटही नमूद करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.