(अमित जाधव / संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने माखजन इंग्लिश स्कूल माखजनमध्ये ता 26, 27 रोजी कला, क्रीडा व सांस्कृतिक मोहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने दशक्रोशीतील प्राथमिक, माध्यमिक शाळांना सहभागी करून घेतले होते. या क्रिडा स्पर्धामध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आरवली नंबर.१ शाळेचे वर्चस्व पाहायला मिळाले.
या शाळेतील मुलांनी व मुलींनी कबड्डी स्पर्धेत सहभागी होऊन मोठ्या व लहान गटात विजय मिळवला, तसेच धावणे या स्पर्धेत ही मुलांनी यश संपादन केले, या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन क्रीडा शिक्षक श्री अरविंद पवार,मुख्याध्यापक श्री अशोक जायभाये, सौ दीक्षा शिगवण यांनी केले.
शाळेने केलेल्या उत्तम कामगिरी बद्द्ल शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.