(रत्नागिरी)
राजापूर येथे जमीनिच्या वादातून अनुसूचित जातीतील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने 3 वर्षे सश्रम कारावास व 16 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावल़ी आहे. अनंत मधुसूदन प्रभूदेसाई (ऱा तळवडे राजापूर) असे आरोपीचे नाव आह़े. त्याच्याविरूद्ध भादंवि कलम 354 (ब) सह अनुसूचित जाती-जमाती कायद्यानुसार राजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तपास करून दोषारोपपत्र ठेवले होत़े.
रत्नागिरी विशेष सत्र न्यायाधीश एल़ ड़ी बिले यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा. सरकारी पक्षाच्यावतीने ऍड़ प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिल़े. खटल्यातील माहितीनुसार, आरोपी अनंत प्रभूदेसाई व पीडित महिला यांच्यात मागील काही वर्षापासून जमिनीवरून वाद सुरू होत़ा. 30 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 च्या सुमारास पीडित महिलेशी वाद असलेल्या जागेतील कुंपण अनंत प्रभूदेसाई त्याचा भाऊ व आई हे तोडत होत़े. ही घटना पीडित महिलेच्या निदर्शनास येताच तिने आरोपी अनंत याला या बाबत विचारणा केल़ी. कुंपण तोडल्याप्रकरणी विचारणा केल्याचा राग येवून आरोपी अनंत याने पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केल़ी. तसेच पीडितेची साडी ओढून फरफटत नेण्याचा प्रयत्न केल़ा. आरोपीने हातातील काठीने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पीडितेने राजापूर पोलीस ठाण्यात दाखल केली होत़ी.
त्यानुसार पोलिसांनी आरोपी अनंत प्रभूदेसाई याच्याविरूद्ध भादंवि कलम 354 (ब),435, 427, 323, 504, 506 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केल़ा. या प्रकरणी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवल़े. या प्रकरणी सरकारी पक्षाकडून एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आल़े. न्यायालयात पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल किरण सपकाळे यांनी काम पाहिल़े.