चैतन्य संस्था प्रेरित त्रिवेणी महिला संघाच्या माध्यमातून राजापूरच्या पश्चिम भागातील स्वयंसहायता महिला बचत गटांच्या 270 महिला “बाईपण भारी देवा” चित्रपट पहायला शहरात दाखल झाल्या होत्या. आडिवरे, कालिका वाडी, कोंबे, नवेदर, कोंडसर, मोगरे, भालावली, नाटे, धाउलवल्ली, जैतापूर, कुवेशी, तुळसुंदे, अणसुरे, वाकी आदी गावातून या महिला सहभागी झाल्या होत्या. वेगवेगळ्या गावातून महिलांना राजापुरात ने आण करण्यासाठी राजापूर आगारातून सहा स्पेशल एस. टी. गाड्यांचे बुकिंग करण्यात आले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून स्वयं सहायता महिला बचत गटाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या या महिला स्वयंस्फूर्तीने आणि स्वखर्चाने या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. सकाळी साडेनऊच्या सुमारास वेगवेगळ्या गावातून निघालेल्या या एसटी गाड्या राजापूर शहरात पोहोचल्यावर राजापुरातील प्रसिद्ध वकिल शशिकांत सुतार आणि पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार महेश शिवलकर यांच्याकडून ग्रामीण भागातून आलेल्या सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले. या उपक्रमात ग्रामीण भागातील तरुण, ज्येष्ठ आणि वयोवृद्ध महिलाही सहभागी झाल्या होत्या. अनेकांनी तर पहिल्यांदाच चित्रपटगृह पाहिले असल्याचे सांगितले.
नेहमीच्या दैनंदिन कामातून उसंत काढत केवळ विरंगुळा आणि मनोरंजन व्हावे सर्वांना आनंद प्राप्त व्हावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी त्रिवेणी संघाच्या सर्व संघ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !