(दुबई)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी तीन खेळाडूंना नामांकन दिले आहे. यात एक वेगवान गोलंदाज, एक यष्टिरक्षक-फलंदाज व एक अष्टपैलू खेळाडूचा समावेश आहे. यामध्ये भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला नामांकन मिळाले आहे.
यात मराहशिवाय दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डिकॉक व न्यूझीलंडचा अष्टपैलू रचिन रवींद्रचा समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंनी 2023 च्या विश्वचषकात आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. महिला खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यूज, बांगलादेशची नाहिदा अ‘तर व न्यूझीलंडची अमेलिया केर यांना नामांकन मिळाले आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर बुमराहने आशिया चषक स्पर्धेतून पुनरागमन केले. तो भारतासाठी विजयी खेळी करणारा खेळाडू ठऱला आहे. ऑक्टोबर महिन्यात त्याने संघासाठी एकूण 14 बळी टिपल्यात. त्याचा एकॉनॉमी रेट 391 आहे.
विश्वचषकात तो अफगाणिस्तानविरुद्ध 4 व इंग्लंडविरुद्ध 3 बळी टिपण्यात यशस्वी झाला. क्विंटन डिकॉकने विश्वचषकात तीन शतके झळकावलीत. त्याने बांगलादेशविरुद्ध 174 धावांची देखणी शतकी खेळी केली. त्याने यष्टिरक्षक म्हणून 10 झेल टिपलेत. न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रने आपल्या पहिल्या विश्वचषकात आपली क्षमता सिद्धकेली. त्याने इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात असे दोन शतके झळकावली. त्याने एकूण 406 धावा केल्या व 3 बळीही घेतले आहेत.