( चिपळूण / प्रतिनिधी )
सरासरी बिल देऊन होणारी ग्राहकांची लूट थांबवावी
चिपळूण:तालुक्यातील हजारो वीज मीटर बंद तक्रार करूनही महावितरणचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. खेर्डी विभागात दोन हजारपेक्षा जास्त वीज मीटर बंद आहेत. तर तालुक्यात हा आकडा आठ ते दहा हजारावर आहे.हे मीटर तातडीने मिळावेत यासाठी संबंधित ग्राहक महावितरणकडे पाठपुरावा करीत आहेत.मात्र त्यांना प्रतिसाद दिला जात नाही.सध्या महावितरणकडे कर्मचारी कमी असल्याचे कारण पुढे केले जाते.जर कर्मचारी कमी असतील तर पश्चिम महाराष्ट्रात येथील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या कशा एखाद्या ग्राहकाने बिल भरण्यास विलंब केला तर त्याची वीज जोडणी तत्काळ बंद केली जाते परंतु मागणी करुनही वीज मीटर दिले जात नाहीत हा विरोधाभास आहे तरी ही परिस्थिती सुधारावी व ग्राहकांना मागणीनुसार मीटर बसवून द्यावे अशी मागणी शौकत मुकादम यांनी केली आहे.बदल्यात सरासरी वीज बिल देऊन ग्राहकांची लूट करीत आहेत.भविष्यात ज्यादा बिल देऊन ग्राहकाला नाहक आर्थिक भुर्दंड बसू शकतो,तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी बंद असणारे वीज मीटर तातडीने दुरुस्त करावे अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा माजी सभापती शौकत मुकादम यांनी दिला आहे.