(राजापूर)
अवकाळी पावसामध्ये तालुक्यातील मूर येथे वीजखांब पडून मूरसह त्या परिसरातील सुमारे अकरा गावांमधील वीजपुरवठा खंडीत झाला होता. महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यानी उपअभियंता शरदकुमार संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माया इलेक्ट्रॉनिक्सचे रूपेश कांबळे यांच्या सहकार्याने पहाटे 2 वा.पर्यंत सुमारे पाच-सहा तासाहून अधिक काळ काम करीत वीजपुरवठा सुरळीतपणे केला.
यामध्ये श्री.कांबळे यांनी आपल्या टिमसह वीजवितरण विभागाच्या कर्मचाऱ्यासह पाचल शाखा कार्यालयाचे जनमित्र यांनी काळोखाची तमा न बाळगता रात्रभर काम केले. त्यासाठी त्यांना पंचायत समितीचे माजी सदस्य बाजीराव विश्वासराव आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले. त्यानंतर सुमारे पाच-सहा तासाच्या मेहनतीनंतर पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास वीजखांब उभे करून खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीतपणे करण्यात यश आले.