(खंडाळा/प्रतिनिधी)
श्री महालक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाटत मिरवणेची पंचवार्षिक निवडणूक काल गुरुवार दिनांक 7 एप्रिल रोजी बिनविरोध पार पडली. यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळ नियुक्त करण्यात आले.
या संचालक मंडळामध्ये ज्योती राम साठे (अध्यक्ष), निता प्रकाश जोशी (उपाध्यक्ष), शितल परशुराम जोग (सदस्य), निता सुधाकर सुर्वे (सदस्य), अश्विनी अशोक खरात (सदस्य), श्रावणी संदीप जंगम (सदस्य), श्वेता संजय चाळके (सदस्य), नम्रता सिद्धार्थ पवार (सदस्य), वृषाली अवधूत काळे (सदस्य), सुगंधा बाबल्या जांभळे (सदस्य), प्रिया राहुल साठे (सदस्य), राजेंद्र मधुसूदन भडसावळे, तर सुधाकर शिर्के यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदी निवड करण्यात आली. या कार्यकारिणीची 2022-2027 या 5 वर्षांच्या कालावधीसाठी निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्थचे श्री एच. पळसमकर यांनी काम पाहिले.
या निवड समितीवेळी संस्थेचे संस्थापक व ग्रामविकास मंडळ वाटद-मिरवणेचे विष्णूदत्त मधुसूदन निमकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच संगमेश्वर बुरंबी येथील सुनील सेल्स अँड सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा सुनील गेल्ये यांनीही या सर्वांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा.