(रत्नागिरी)
वीज कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहीत रोजंदारी पद्धतीने (NMR) वयाच्या ६० वर्षापर्यंत जॉब सिक्युरिटी देऊन सेवेत कायम सामावून घ्यावे किंवा समान कम समान वेतन द्यावे, या प्रलंबित मागण्यांसाठी वीज कंत्राटी कामगार संघ संघटनेच्यावतीने १ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांनी एकजुटीने त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. जयेंद्र थुळ आणि सरचिटणीस श्री. धनंजय चव्हाण यांनी केले आहे.
महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील नियमित रिक्त पदांवर मागील 15 ते 20 वर्षापासून फक्त १४ हजार, १५ हजार रु. प्रतिमहिना काम करत आहेत. या कामगारांना कंत्राटदार विरहीत रोजंदार पद्धतीने (NMR) वयाच्या ६० वर्षापर्यंतजॉब सिक्युरिटी देऊन सेवेत कायम सामावून घ्यावे किंवा समान कम समान वेतन द्यावे, या प्रलंबित मागण्यांसाठी वीज कंत्राटी कामगार संघ संघ्तानेच्यावातीने १ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय वीज कंत्राटी कामगार संघाच्या पुणे येथील भारतीय मजदूर संघाच्या कार्यालयात केंद्रीय कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला २८ जिल्ह्यांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.
शासकीय देय रकमेचा अपहार करणाऱ्या व कामगारांचे आर्थिक शोषण करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. अन्यायग्रस्त कामगारांना कामावर घ्यावे व प्रलंबित धोरणात्मक निर्णय होईपर्यंत या कामगारांना २० हजार रु. पगारवाढ, सुरक्षा साधने, मेडिक्लेम, प्रशिक्षण, गणवेश, रेनकोट, बूट, गणवेश धुलाई भत्ता, पेट्रोल भत्ता आदी मागण्या मंजूर कराव्यात, यासाठीही शासन स्तरावरपाठपुरावा करण्याबाबत चर्चा केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटनेच्या केंद्रीय शिष्टमंडळासोबत बैठक घेतल्यास या समस्यांवर नक्कीच तोडगा निघेल असा विश्वास महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष श्री. निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केला, असे श्री. थूळ यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.