(करिअर)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मधून विविध संवर्गातील 800 पदांच्या भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षा दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेमुळे विविध संवर्गातील 800 पदांवर भरती केली जाणार. सरकारी नोकरी शोधणाऱ्या आणि MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ ची ८०० पदांच्या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. दुय्यम निबंधक पदाची भरती प्रक्रिया प्रथम एमपीएससीमार्फत करण्यात येणार असून, या पदाची १९९४ नंतर पहिल्यांदाच भरती होणार आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहायक कक्ष अधिकारी गट-ब, राज्य कर निरीक्षक गट-ब, पोलीस उप निरीक्षक गट-ब, दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-पोलीस उप निरीक्षक गट-ब या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२२ असणार आहे.
खालील पदांसाठी जाहिरात –
राज्य कर निरीक्षक गट-ब (State Tax Inspector)
पोलीस उप निरीक्षक गट-ब (olice Sub-Inspector)
सहायक कक्ष अधिकारी गट-ब (Assistant Section Officer)
दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-पोलीस उप निरीक्षक गट-ब (Sub Register)
एकूण जागा – ८००
परीक्षेचे नाव – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट–ब संयुक्त पूर्व परीक्षा – 2022
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
अर्ज शुल्क – अमागास – रु. 394/-, मागासवर्गीय- रु. 294/-
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 जून 2022
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
Important Instruction For MPSC Duyyam Sevam Main Exam 2022
- अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातिल.
- अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
How to Apply For MPSC Duyyam Sevam Recruitment 2022
- आयोगाच्या ऑनलाईन आर प्रणालीवर नोंदणी करावी.
- सदर पदांकरिता अर्ज सुरू होण्याची तारीख 25 जून 2022 आहे.
- नोंदणी केल्यानंतर खाते तयार केलेले असल्याचे व ते अध्यायात करण्याची आवश्यकता असल्यास ते करावे.
- विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवशक कागदतपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा.
- परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करावेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या आधीही 26 फेब्रुवारी 2022 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब, संयुक्त पूर्व परीक्षा 2021 सहायक कक्ष अधिकारी (MPSC Group B Result 2022 for ASO Prelims Exam) पदासाठीचा निकाल 1 जून 2022 रोजी जाहीर करण्यात आला होता.
MPSC पूर्व परीक्षेतील रचनेत महत्वपूर्ण बदल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षेतील रचनेत महत्वपूर्ण बदल केला आहे. त्यानुसार आता सिसॅटचा पेपर हा आर्हता प्राप्त करण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. या पेपरमध्ये ३३ टक्के गुण प्राप्त उमेदवारांचे पेपर क्रमांक एकमधील गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. या निर्णयामुळे कला, वाणिज्य शाखेतील उमेदवारांचे मुख्य परीक्षा देण्याचे प्रमाण वाढेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
असा असेल बदल…
आता राज्यसेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या उमेदवारांचा पेपर क्रमांक दोन तपासल्यानंतर, ज्या उमेदवारांना किमान ३३ टक्के गुण अर्थात ६६ किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त असतील अशा उमेदवारांचा पेपर क्रमांक एक तपासला जाईल. पेपर क्रमांक एकच्या गुणांच्या आधारे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार केली जाईल.“सिसॅटचा पेपर पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार असल्याने कला, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होणार आहे. आत्तापर्यंत सिसॅटच्या गुणांमुळे विज्ञान शाखा, तंत्रशिक्षण असलेल्या उमेदवारांचे पारडे जड राहात होते. आता सर्वांना समान संधी उपलब्ध होऊ शकतील.
”एमपीएससीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार राज्यभरातील ३७ केंद्रांवर ८ ऑक्टोबरला पूर्व परीक्षा घेण्यात येईल. तर पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये किंवा त्यानंतर होण्याची शक्यता आहे. सहायक कक्ष अधिकारी गट ब या संवर्गातील ४२, राज्य कर निरीक्षक गट ब या संवर्गातील ७९, पोलीस उपनिरीक्षक गट ब या संवर्गातील ६०३ आणि दुय्यम निबंधक संवर्गातील ७८ पदांची भरती केली जाणार आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात (Adv.049 – 53/ 2022) : https://cutt.ly/aKnBoUh
(टीप : सदर भरती पोस्ट आपल्या मित्र मंडळी, परिवारात अवश्य शेअर करा )
Post Views: 2,574