(रत्नागिरी)
रत्नागिरीमधे सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणारे समुदाय आरोग्य अधिकारी अनेक अडचणींचा सामना करत उपकेंद्र स्तरावर आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत असतात. रत्नागिरीतील या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या अडचणींवर चर्चा करणेसाठी आणि संघटना अधिक सक्षम करणेसाठी चिपळूण येथील खेरशेत या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटना सचिव डॉ. अश्रफ अली शेख, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अमोल चव्हाण, कोल्हापूर जिल्हा सचिव डॉ.किरण नलवडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी उत्तम अशा सोप्या शब्दात समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यावर सविस्तर प्रकारे मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीमध्ये रत्नागिरी जिल्हा नवनिर्वाचित कार्यकारिणी ठरवण्यात आली. त्यावेळी उपस्थित समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या सहमताने (अध्यक्ष) म्हणून डॉ. रुपाली भोकसे, (उपाध्यक्ष ) डॉ.मनोजकुमार पाटील , डॉ. प्रशांत कोकरे, तर (सचिव) डॉ. सुशांत कांबळे, डॉ. गोकुळ ढाकणे, (कोषाध्यक्ष) डॉ. विनीत सतोपे तसेच (सहकोषाध्यक्ष) डॉ. नागेश आनवणे, डॉ. संपदा वाघमारे (कार्याध्यक्ष) डॉ. लहू खरमाटे, यांचा समावेश करण्यात आला (सल्लागार समिती) यामध्ये डॉ. अभिनय भोजने, डॉ. अनिल पवार, डॉ. संजय अंबुसे (जिल्हा संघटक) डॉ. सुशांत येडगे, डॉ. शुभम भिंगे, डॉ अश्विनी कांबळे (जिल्हा महिला प्रतिनिधी) डॉ. दमयंती कदम, डॉ. कीर्ती जाधव, डॉ. अश्विनी मेने, डॉ अंकिता माने, डॉ. ऋतुजा कुडाळी, डॉ. पुनम घुगे (जिल्हा व्यवस्थापक) डॉ शुभम माळी, डॉ. राजेश मोहिते, डॉ. मायकल चोपडे, डॉ. तेजस भंगाळे, (जिल्हा समन्वयक) डॉ अमृपाली कांबळे, डॉ. प्रल्हाद आरे, डॉ. निषा भंडारे, डॉ. सायली झाडेकर अशा प्रकारे संघटनेचे पदाधिकारी नेमण्यात आले.
आलेल्या पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. संपदा वाघमारे आणि डॉ. प्रियंका शेळके यांनी केले. मेळाव्यामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या अडचणी यावर चर्चा करण्यात आली व प्रमुख पाहुणे यांच्या वतीने चांगले मार्गदर्शन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या व त्यांनी ग्वाही दिली की, समुदाय आरोग्य अधिकारी राज्य सांगताना तुमच्या सदैव पाठीशी असेल. शेवटी आलेल्या पाहुण्यांचे आणि उपस्थीत सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांचे आभार मानून आनंदाने महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी जिल्हा रत्नागिरी यांचा मेळावा पार पडला.