रत्नागिरी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने नायब तहसीलदार सौ. आर. आर. टाकळे व सुरेश पाटील, पोलीस स्थानकातील श्री. जाधव, गटशिक्षणाधिकारी प्रदिप पाटील यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनातील विषय पुढीलप्रमाणे १)शिक्षकांच्या याद्या अपडेट करून शाळा,सर्व माध्यमिक शाळा,महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना कामामध्ये सामावून घेण्यात यावे. २) शिक्षकांच्या ड्युटीमध्ये असमानता असणार नाही याची दक्षता घ्यावी. ३) शिक्षकांना बारा दिवसाच्या वर ड्युटी असणार नाही.याची काळजी घ्यावी. ४)पन्नास वर्षाच्या वरील(1970च्या आधीच्य) शिक्षकांना ड्युटी मधून वगळण्यात यावे. ५)सर्व शिक्षकांचे लसीकरण करूनच ड्युटी लावण्यात यावी या मागण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. मागण्यांचे निवेदन स्वीकारून एक सकारात्मक चर्चा झाली वरील विषयांपैकी काही विषय हे शिक्षणाधिकाऱ्यांच्या अधिकारात येत असून ते रत्नागिरीमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांच्या चर्चेतून योग्य वेळी व भेटीत चर्चा करण्यात येईल व निवेदन देण्यात येईल .
या भेटींचे तालुका अध्यक्ष अनंतकुमार मोघे व तालुका सहसचिव मधुकर कोकणे व कार्यकारणी सदस्य मंगेश गुरव, किरण शेट्टी तसेच जिल्हा कार्याध्यक्ष किरण देशपांडे या सर्व शिक्षकांच्या नेतृत्वाखाली या भेटी घेण्यात आल्या.