(रत्नागिरी)
दिनांक २४/०९/२०२२ रोजी जि.प. पू. प्रा.शाळा नं ५ येथे संघटनेची सभा श्री. मुबारक शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सर्वप्रथम सर्व उपस्थित सभासद बंधूभगिनींचे सरचिटणिस श्री. विश्वास तळसंदेकर यांनी शाब्दिक स्वागत केले. त्यानंतर संघटनेत आलेल्या नविन सभासद बंधू भगिनींचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. ते खालील प्रमाणे.
१)श्री.विजय धोंडू साळसकर.
२)श्री. विनोद दत्ताराम सावंत.
३) सौ. मधुरा सूर्यकांत सरदेसाई.
४)श्री.सूर्यकांत नाना लांजेकर.
५)सौ. मनिषा महेंद्र तेंडुलकर.
६)श्री. अशोक तुकाराम कुंभार.
यानंतर अध्यक्षांच्या हस्ते वयोवृध्द सभासद श्री.गांधी गुरुजी सौ.वैशाली अशोक पाध्ये. सौ.संयोगिता सदाशिव पाध्ये यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले.
संघटना कामाचा आढावा – यामध्ये संघटनेच्या मार्फत करण्यात आलेल्या कामाचा आढावा अध्यक्षांनी सभागृहासमोर ठेवला.गेल्या सात वर्षापासून लांजा तालुक्यातील ५० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेचा एकही हप्ता अजून पर्यंत दिला नाही. तसेच गट विम्याची रक्कम गेल्या सात वर्षापासून दिली नाही. अनेक प्रकारची बिलं देणे बाकी आहे. याबाबत सभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. भविष्यात अशीच अवस्था राहिली तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याच्या मानसिकता स्पष्ट केली.
त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. रत्नागिरी यांनी बोलावलेल्या सभेत तालुक्याच्या वतीने मांडलेल्या समश्या इतिवृत्त वाचून दाखविले. तसेच जिल्हाध्यक्ष श्री. बबन बांडागळे यांचे सोबत उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांची घेतलेली भेट आणि सातव्या वेतन आयोगाचा एकही हप्ता न मिळालेल्या सभासदांचे अर्ज सादर केल्याचा वृतांत, गट विकास अधिकारी पं. स. लांजा यांची घेतलेल्या भेटीचा वृत्तांत ठेवला. यावर सभागृहात भरपूर चर्चा करण्यात आली. सदर चर्चेत प्रामुख्याने श्री.प्रभाकर कोळवणकर श्री. सूर्यकांत लांजेकर श्री.यशवंत पाडावे.श्री.विनोद सावंत. श्री.विलास चाळके.श्री विजय साळसकर. सौ. नमिता बारस्कर इत्यादीनी भाग घेतला.
१७ डिसेंबर च्या पेन्शनर डे बाबत चर्चा करण्यात आली. व कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सभा लावण्याचे ठरले.सदर सभेत लोकमान्य मल्टिपर्पज को-आॕप. सोसायटी लि. चे अधिकारी कर्मचारी यानी पतपेढीच्या आर्थिक लाभाच्या योजना संदर्भात मार्गदर्शन केले. शेवटी सरचिटणिसांनी सर्वांचे आभार मानून सभा संपल्याचे जाहिर केले.