(रत्नागिरी)
महाराष्ट्र पोलीस ही देशाची शान आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय सक्षमपणाने गृहमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. राज्यातील पोलीस हे देशात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरामध्ये पार पडलेल्या शासन आपल्या दारी या महत्वाकांशी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला जिल्हा विकास निधीतून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या १० बोलेरो वाहने, २० मोटार सायकली व चार बसेसच्या लोकार्पणाचे निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी पोलीस दलासाठी घेण्यात आलेल्या वाहनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री दादा भुसे, पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, रत्नागिरी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्यासह पोलीस दलातील इतर अधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते.