( संगमेश्वर / प्रतिनिधी )
नुकतीच फलटण, सातारा येथे ३२ वी राष्ट्रीय किशोर व किशोरी खो खो स्पर्धा २०२२ पार पडली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघाने सुवर्ण पदक पटकावले. महाराष्ट्राच्या या विजयात किशोर संघात संगमेश्वर तालुक्याचा राष्ट्रीय खेळाडू अथर्व गराटेने आपल्या बहारदार खेळाच्या कौशल्याने महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. त्याच्या या कामगिरीचे संगमेश्वर मध्ये कौतुक होत आहे.
या राष्ट्रीय खेळाडूचे म्हणजेच अथर्व गराटेचे गुरुवार 3 नोव्हेंबर दुपारी ३.०० वाजता देवरुख येथे आगमन होणार आहे. यावेळी संगमेश्वर तालुक्यातील बहुसंख्य लोक लाडक्या अथर्वचे स्वागत करण्यासाठी जमणार आहेत. देवरूखातील छ.शिवाजी महाराज चौकात त्याचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.