(रत्नागिरी / प्रतिनिधी)
महाराष्ट्रकच्या उद्योग क्षेत्राला एक नवीन दिशा आणि चालना देण्यासाठी तसेच महाराष्ट्रात ब्रिटन मधील उद्योजक यावेत यासाठी राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत हे दोन दिवसाच्या लंडन दौऱ्यावर आहेत. लंडन दौऱ्यामध्ये ते ब्रिटन सरकारच्या प्रतिनिधीशी भेट घेणार असून राज्यात नवीन उद्योग आणि गुंतवणूक करण्यासाठी निमंत्रण देणार आहेत. उद्योगमंत्री ना.उदयजी सामंत यांचा हा दौरा राज्यासाठी येत्या काळात लाभदायक ठरणार आहे.
उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी ब्रिटन मधील स्मार्ट मिटर बनविणाऱ्या सायंकोंड कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी श्री. क्रीस जोन्स यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र राज्य उद्योग विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योग विभाग आयुक्त दीपेंद्र कुशवाह, माहिती व तंत्रज्ञान विभाग आयुक्त संतोष भिसे उपस्थित होते.