(नाशिक)
संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील ३४,९९९ विहिरींचे पाणी अयोध्येतील श्री रामाच्या जलाभिषेकसाठी देण्यात आले. हे पाण्याचे कलश अयोध्येत राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
हे सर्व कलश गेल्या मिरवणुकीने मार्गस्थ करण्यात आले झाले आहेत. त्यानंतर शनिवारी चंपत राय यांच्याकडे ते सोपविण्यात आले. हे कलश नाशिक, अहमदनगर, परभणी, धुळे, जळगाव,जालना, पुणे, ठाणे जिल्ह्यातील शेतकर्यांनी आणले होते. जनार्दन स्वामींचे ३४ वे पुण्य स्मरण नुकतेच झाले. त्यावेळी भाविकांना किमान ३४ शेतकर्यांच्या विहिरीतून पाणी आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर एक हजारहून गावातून हे कलश आणण्यात आले होते. हे कलश निफाड तालुक्यातील ओझर मिग येथील जनशांतीधाम आश्रमात जमा करण्यात आले होते.