(खेड/इक्बाल जमादार)
या ना त्या कारणाने खेड सध्या चर्चेत आहे. काल खेड येथे मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्कच्या स्पेशल पथकाने मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूचे 1000 बॉक्स जप्त केले. ही कारवाई खेड तालुक्यातील लवेल येथे करण्यात आली.
गोवाहून दारूने भरलेला ट्रक मुंबईकडे जात असल्याची माहिती उत्पादन विभागाच्या मुंबई कार्यालयाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांच्या स्पेशल पथकाने महामार्गावर पाळत ठेवली होती. लवेल येथे गस्त घालत असताना त्यांना गोव्याकडून मुंबईकडे जाणारा तो ट्रक आढळून आला. अधिकाऱ्यांनी तो ट्रक थांबवून तपासणी केली असता ट्रकच्या मागील भागात गोवा बनावटीचे सुमारे १००० बॉक्स आढळून आले. अधिकाऱ्यांनी चालकांना याबाबत विचारणा केली असता तो व्यवस्थित उत्तरे देऊन शकला नाही.
अधिकाऱ्यांनी तो ट्रक दारूच्या बॉक्ससह ताब्यात घेऊन खेड येथील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आणला. रात्री उशिरा पर्यंत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. असे असले तरी गोव्याहून हा ट्रक इथपर्यंत पोहोचलाच कसा? कारण महामार्गावर अनेक ठिकाणी चेकपोस्ट आहेत. तरीही एवढं धाडस झालं कस असा प्रश्न उपस्थित होत आहे. येथील पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून दारू माफियाचा गोवा बनावटीच्या दारूचा व्यवसाय चालूच राहणार आहे.