(राजापूर / तुषार पाचलकर)
हातिवले येथील टोलनाका मोडतोड प्रकरणी पोलीसानी गुन्हा नोंद करुन अटक केलेले मनसेचे तालुकाध्यक्ष पंकज पंगेरकर आणि उपाध्यक्ष जयेंद्र कोठारकर यांना राजापूर दिवाणी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
आज दिनांक १८/०८/२०२३ रोजी ११.३० वा. आरोपीत पंकज सिताराम पंगेरकर (वय ३४ वर्षे रा. पंगेरेवाडी अणुसरे, ता.राजापूर, जि.रत्नागिरी) व जयेंद्र विलास कोठारकर (वय ३८ वर्षे रा. कोकरी धाऊलवल्ली, ता.राजापूर, जि. रत्नागिरी) यांना मा. न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने त्यांचे समर्थनार्थ मा. न्यायालय राजापूर समोर रस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते १) राजेश मनोहर पवार वय ४५ वर्षे, मनसे जिल्हाउपाध्यक्ष, रा. तिवंठामाळ मंदरुळ, ता.राजापूर, जि.रत्नागिरी, २) प्रकाश श्रीपत गुरव वय ४७ वर्षे, मनसे राजापूर शहर अध्यक्ष, रा. कोदवली गुरववाडी, ता.राजापूर, जि. रत्नागिरी, ३) संजय विष्णू जडयार वय ३५ वर्षे, मनसे राजापूर तालुका सचिव, रा. ओणी गोरुलेवाडी, ता.राजापूर, जि. रत्नागिरी, ४) मंदार मारुती राणे, वय ३८ वर्षे, मनसे उपतालुका अध्यक्ष, रा. शेजवली, ता.राजापूर, जि. रत्नागिरी, ५) संतोष रामचंद्र मिरगुले वय ४९ वर्षे, मनसे साखर/कोंबे उपविभाग अध्यक्ष, रा. मिरगुलेवाडी, साखर, ता.राजापूर, जि.रत्नागिरी, ६) नितीन महादेव पाटणकर वय ४५ वर्षे, मनसे खरवते उपविभाग अध्यक्ष, ७) नितीन गंगाराम साळवी वय ३५ वर्षे, मनसे देवाचे गोठणे विभाग अध्यक्ष रा. धाउलवल्ली, ता.राजापूर, जि.रत्नागिरी, ८) संकेत प्रकाश वाडेकर वय ३३ वर्षे, मनसे अणसुरे विभाग अध्यक्ष रा. वाडेकरवाडी, अणसुरे, ता.राजापूर, जि.रत्नागिरी, ९) मनोज मनोहर वाडेकर वय ३२ वर्षे, मनसे सागवे शाखाध्यक्ष रा. कात्रादेवी, ता.राजापूर, जि. रत्नागिरी, १०) अमिनेश चंद्रकांत वाडेकर वय १९ वर्षे, मनसे अणसुरे शाखाध्यक्ष रा. सागवे घोडेपोईवाडी, ता.राजापूर, जि.रत्नागिरी, ११) जयेश गंगाराम तांबे वय ४२ वर्षे, मनसे अणसुरे शाखाध्यक्ष रा.अणसुरे वरचीवाडी, ता.राजापूर, जि.रत्नागिरी, १२) सुरेंद्र नारायण मयेकर वय ४० वर्षे, मनसे सागवे विभाग अध्यक्ष रा. सागवे घोडेपोईवाडी, ता.राजापूर, जि.रत्नागिरी, १३) विलास महादेव भाटले वय ४६ वर्षे मनसे घाउलवल्ली उपविभाग अध्यक्ष रा.धाऊलवल्ली भाटलेवाडी, ता.राजापूर, जि.रत्नागिरी, १४) सुनिल मनोहर जठार वय ६३ वर्षे माजी मनसे राजापूर तालुका शहरअध्यक्ष रा.घर नं.८२, समर्थनगर, ता.राजापूर, जि.रत्नागिरी, १५) ओमकार संजय पावसकर वय ३३ वर्षे, मनसे सैनिक राहातिवले, ता.राजापूर, जि.रत्नागिरी, १६) अब्बास अकबर मुजावर वय ४५ वर्षे, मनसे कार्यकर्ता, रा. रानतळे, ता.राजापूर, जि.रत्नागिरी असे एकत्रित जमलेले होते.
त्या अनुषंगाने सदर ठिकाणी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू नये म्हणून तसेच कोणत्याही प्रकारची वाहतुक कोंडी होवू नये या कारणास्तव त्या सर्वाना महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ६९ प्रमाणे ताब्यात घेवून राजापूर पोलीस ठाणे येथे आणून कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य करु नये अशी समज देवून महा. पोलीस कायदा कलम ६९ प्रमाणे मोकळीक करण्यात आली आहे व त्यांना सीआरपीसी/१४९ प्रमाणे नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.
गुरूवारी मुंबई गोवा हातिवले टोल नाक्यावर मोडतोड करण्यात आली होती. त्यामध्ये तेथील केबीनच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. राजापूर पोलीसानी मनसेचे तालुकाध्यक्ष पंकज पंगेरकर आणि तालुका उपाध्यक्ष जयेंद्र कोठारकर यान्ना ताब्यात घेवुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता मनसेच्या त्या उभय पदाधिकाऱ्याना आज (शुक्रवारी दि. १८ ऑगस्ट) येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती राजापूर पोलीसानी दिली.